लग्नात भटजी अडथळा ठरत असतील तर पळून जाऊन लग्न करा, असा मिश्किल टोला राष्ट्रवादी, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना लगावला. शिवसेना ( ठाकरे गट) आणि वंचितचा साखरपुडा झाला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन भटजी अडथळा ठरत (If Bhatji is a hindrance elope and marry Jayant Patil gave Prakash Ambedkar advice आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं, यावर आता जयंत पाटील यांनी मिश्किल टोला लगावला आहे.)
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघाली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत, तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावं लागत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावर आता जयंत पाटील यांनी मिश्किल टोला लगावला आहे.
… तर पळून जाऊन लग्न करा
जयंत पाटील म्हणाले की, दोघांच्या लग्नाला भटजी अडचण करत असेल तर पळून जाऊन लग्न करणं हाच पर्याय आहे. आम्हाला कोणाचंही वावडं नाही. भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडी निर्माण झाली आहे. अघाडीत सहभागी झालेल्या सर्वांच स्वागत नेत्यांनी केलं आहे. आघाडीत आल्यानंतर धोरणानुसार काम केलं पाहिजे.
तसंच, महाराष्ट्रात सर्वजण एकत्रित आले, तर निश्चित फायदा होईल. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सकारात्मक असले, तर स्वागत करतो. सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कोणाला टाळणं ही आमची आणि काँग्रेसची भूमिका नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
नांदेड प्रकरणावर आंबेडकरांची प्रतिक्रिया
प्रकाश आंबेडकरांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, “या घटनेतील 24 मृतांमध्ये 12 नवजात शिशूचा समावेश असल्याचे ऐकून मी आणि माझी पत्नी प्रचंड अस्वस्थ झालो. या घटनेत नवजात मुलांचे पालक, विशेषत: त्याच्या मातांना काय वाटत असेल. याची आपण कल्पनाही करू शकत नाही.” अशी अतिशय भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सरकारच्यावतीने मात्र याप्रकरणी सारवासारव करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी आणि औषधांचा तुटवडा असल्याचे धक्कादायक चित्र या घटनेनंतर समोर येत आहे.”, असं आंबेडकर म्हणाले.
(हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच जातनिहाय जनगणना? बिहारमधील जनगणेवर मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान )