नांदेड : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी राज्य सरकारने समितीची स्थापना केली आहे. ही समिती कुणबी नोंदी शोधण्याचे काम करत आहे. पण मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावर राज्याचे मंत्री छगन भुजबल यांनी विरोध केला आहे. छनग भुजबळ यांना मतदान करू नका असे आवाहन केले जात आहे. जर छनग भुजबळ यांना पाडले तर 160मराठा आमदारांना पाडू, अशा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला दिला आहे. प्रकाश शेंडगेंनी आज नांदेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
प्रकाश शेंडगे म्हणाले, “छनग भुजबळ हे ओबीसी समाजाच्या हिताची भूमिका घेतली आहे. यामुळे मराठा समाजाने त्यांना मतदान करून नये, असे आवाहन केले जात आहे. पण राज्यात 60 टक्के ओबीसी आहेत आणि छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. जर छगन भुजबळांना टार्गेट केले तर ओबीसी समाज हा 160 मदार संघातील मराठा आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही”, असा थेट इशारा प्रकाश शेंडगे यांनीदिला आहे.
हेही वाचा – ICC World Cup 2023 : “साहबने बोला हैं…”; विश्वचषक अंतिम सामन्याआधी राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
आमची सुरक्षा करण्यास सक्षम
मनोज जरांगे पाटील जालन्यात उपोषण करत असताना काही मराठा आंदोलनाला हिंसंक वळण आले आहे. यामुळे राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांची घरे मराठा आंदोलकांनी पेटवून दिली होती. यावरून प्रकाश शेंडगे म्हणाले, आम्ही आमची सुरक्षा करण्यास सक्षम आहोत. पण यानंतर जे काही घडेल याला सरकार जबाबदार असणार आहे, असे ते म्हणाले.