मुंबई : जालन्यात मराठा आंदोलनकांवर झालेल्या लाठीमारात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. पालघरमधील रिपाईच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थिती होते. यावेळी पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी वक्तव्यव केले.
रामदास आठवले म्हणाले, “जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारात देवेंद्र फडणवीसांचा कुठलाही हात नाही. तर ही पोलिसांची दादागिरी आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्याचा निर्णय पोलिसांनी परस्पर करत घेला आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले असून ही त्यांची जबाबदारी आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – “ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा…”, विजय वडेट्टीवारांची मागणी
लोकसभा निवडणुकीसंदर्भात रामदास आठवले म्हणाले…
आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाईला दोन जागेसाठी आग्रही असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. यापूर्वी 2019 लोकसभा निवडणुकीत रामदास आठवलेंचा पराभव झाला होता. पण राम दास आठवलेंनी शिर्डीत जनसंपर्क वाढविला असून आगामी लोकसभा निवडणुकती निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी आठविला आहे.