घरदेश-विदेशअरे, मी दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर मला अटक करा; केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल

अरे, मी दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर मला अटक करा; केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपकडून आपल्याला गोवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत लिहिले की, केजरीवाल दहशतवादी आहेत. एचएमने तपास सुरू केला. त्याचे काय झाले? आता गुजरात/एमसीड आदी ते केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असे म्हणत आहेत, अहो, केजरीवाल दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर त्याला अटक करा ना? केजरीवाल दहशतवादी किंवा भ्रष्ट नाही. केजरीवाल हे जनतेचे लाडके आहेत. याचा भाजपला फटका बसला आहे. असा दावा केजरीवालांनी केला आहे. (if i am a terrorist or corrupt then arrest me arvind kejriwal targets bjp)

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वतःला भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून पुढे येत आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत.

- Advertisement -

आपकडून इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. इसुदान गढवी हे आपचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील आहेत. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे. या बैठकीत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटीलही सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

राज्यात 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार असून येथे पंतप्रधान मोदींच्या अनेक सभा होत आहेत.


हेही वाचा : सत्तारांचे समर्थन नाहीच, मग राऊतांवर गुन्हा दाखल का नाही? चित्रा वाघ यांचं विरोधकांवर टीकास्त्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -