घरताज्या घडामोडीमी अपशब्द वापरला असेन तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन - संजय शिरसाट

मी अपशब्द वापरला असेन तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन – संजय शिरसाट

Subscribe

मी सुषमा अंधारे यांचा अपमान केला असल्याचे बोलले जात आहे. मी जर सुषमा अंधारे यांच्याबद्दल अश्लिल शब्द वापरला असेल तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन, असे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले.

मी सुषमा अंधारे यांचा अपमान केला असल्याचे बोलले जात आहे. मी जर सुषमा अंधारे यांच्याबद्दल अश्लिल शब्द वापरला असेल तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन, असे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले. शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला.

“सुषमा अंधारे चावी दिल्या सारख्या आपल्या मान हलवताता आणि सर्वांवर आरोप करत सुटतात. माझा भाऊ..माझा भाऊ असे त्यांचे पर्मनंट वाक्य आहे. एखाद्याला माझा भाऊ म्हणायचं आणि त्याच्याबद्दल जे काही वाईट बोलता येईल ते बोलायचे. म्हणजे त्यामधून माफी मिळते. म्हणजे भाऊ बोलल्यानंतर काही बोललं तरी माफी मिळते”, असे संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

“मी सुषमा अंधारे यांचा अपमान केला असल्याचे बोलले जात आहे. मी जर सुषमा अंधारे यांच्याबद्दल अश्लिल शब्द वापरला असे कोणीही सिद्द करून दाखवले तर, मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन. मला संजय शिरसाट म्हणतात. मी डबल गेम करणारा माणूस नाही. मला सत्ता महत्त्वाची नाही. परंतु, तुम्हाला अधिकार कोणी दिला. महिलेचा अपमान झाला असेल बोलत आहात. आपण महिला असाल तर, महिलेसारखे बोला”, असेही शिरसाट म्हणाले. तसेच, सर्वांना शिव्या देण्याचे कंत्राट तुम्हाला दिलंय कोणी? असा सवाल उपस्थित करत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला.

“तुमच्या पाठीमागे जे कर्तेधर्ते आहेत त्यांनाही सांगतो संजय शिरसाट पोटासाठी राजकारण करणारा माणूस नाही. तुम्हाला जर लढायचं असेल तर समोरासमोर लढा. यापुढं लक्षात ठेवा माझ्याविरोधात जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. कुठेही मी मागं हटणार नाही. गेली उडत ती आमदारकी, यासाठी माझा जन्म झाला नाही. ज्या शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे त्याच बाण्यानं मी लढणार आहे”, असे संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

“हे जे सुरु आहे त्याकडं लोक डोळे उघडे ठेवून बघत आहेत. सगळ्याचं तुमच्याकडं लक्ष आहे. आम्हाला घेणं देणं नाही, जेवढं वाटोळ करायचं आहे तेवढं त्या पक्षाचंही करा. तुम्हाला एका ठिकाणी थांबायची सवय नाही. आत्तापर्यंतची जे काही तुमचं भ्रमण सुरु आहे, इथं तुमचा शेवट होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही सर्व पक्ष फिरुन गोल चक्कर मारून एका काठावर तुम्ही आला आहात. वैयक्तिक बाबतीत मी जात नाही, परळीत कोणाची धिंड काढली होती हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळं जास्त बोलायला सांगू नका, तुम्हाला जर खोलात जाता येतं ना, तर मलाही खोलात जाता येतं मग तुमची पळता भुई थोडी होईल”, अशा शब्दांत यावेळी सिरसाट यांनी अंधारे यांना इशारा दिला आहे.

नेमके काय म्हणाले शिरसाट?

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार, भुमरे माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत,’ असं विधान शिरसाट यांनी केलं होतं.


हेही वाचा – सावरकरांशी लढायचे की मोदींशी हे ठरवा, गोंधळ नको; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -