घर महाराष्ट्र आज न्याय मिळाला नाही, तर पाणीही घेणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

आज न्याय मिळाला नाही, तर पाणीही घेणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

Subscribe

जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आज योग्य तो निर्णय घेतला नाही, तर मी पाणीही घेणार नाही, असं ते म्हणाले आहेत. यामुळे आता हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचं दिसून येत आहे.

जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आज योग्य तो निर्णय घेतला नाही, तर मी पाणीही घेणार नाही, असं ते म्हणाले आहेत. यामुळे आता हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचं दिसून येत आहे. (If justice is not done today even water will not be taken Manoj Jarange patil s warning to Government)

सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही सरकारचे ऐकत आहोत. सरकार 100 टक्के प्रयत्न करत आहे. मी आणि माझा समाज सरकार व डॉक्टरांना प्रतिसाद देत आहोत. आज आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात मंत्रालयात आज मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समुदायाचा दाखल देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी अभ्यास करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या नेतृत्त्वात 11 सदस्यीय समिती गठीक करण्यात आली होती. या समितीने मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी व त्याकाळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ आदींचा अभ्यास केला आहे.

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी शुक्रवारी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्याला हिंसक वळण लागलं. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या आणि रबरी गोळ्याही झाडल्या. जमावाच्या दगडफेकीत एका वाहनाच्या काचा फुटल्या, तर आंदोलकांनी एका मालवाहू वाहनास आग लावली. दगडफेकीत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह काही पोलीस जखमी झाले. आता याच घटनेवरून सध्या राज्यात तणावाचे वातावरण आहे.

(हेही वाचा: …म्हणून शांततेने सुरू असलेले मराठा आंदोलन चिरडण्याचा निर्णय, ठाकरे गटाचा थेट आरोप )

- Advertisment -