घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरतुमच्या डोळ्यादेखत OBC आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर...; भुजबळांचा भाजपला थेट इशारा

तुमच्या डोळ्यादेखत OBC आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर…; भुजबळांचा भाजपला थेट इशारा

Subscribe

पोलिसांना माझे आवाहन आहे की, गाव बंदीचे फलक तत्काळ हटवा, हे लोकशीहीचे राज्य आहे. मुख्यमंत्र्याना, उपमुख्यमंत्र्याना सांगणं आहे.

अंबड (जालना) : मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधावरून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात शुक्रवारी (17 नोव्हेंबर) मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजपला थेट इशारा दिला. (If OBC reservation is going to be reduced before your eyes… Bhujbals direct warning to BJP)

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ओबीसींची गोष्ट कॉंग्रेस करते, राहुल गांधी करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हणतात की, मी ओबीसी आहे. अरे आज या महाराष्ट्रात ओबीसींच शिरकान होतय कुणी तरी लक्ष द्या, आम्ही तर लढणार आहोत. येथे भाजपचे अनेक माझे मित्र बसलेले आहेत. महात्मे हे खासदार आहेत. तुम्ही सांगा तुमच्या नेत्यांना कारण, आज 60 टक्के ओबीसी बीजेपीला मतदान करतात. पण हे उद्या तुमच्या डोळ्यादेखत आमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर हे 60 टक्के काय करतील असे म्हणत छगन भुजबळ यांनी आगामी निवडणुकीत ओबीसींच्या मतदानाबाबत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.

- Advertisement -

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, आता एवढंच काय, म्हाडा तालुक्यात तुळशी म्हणून गाव आहे. तेथे न्हावी कुटुंबाने मतदान केलं नाही म्हणून त्यांनी तेथील मराठा समाजातील लोकांनी त्या न्हाव्याचे घर जाळून टाकले, तेथे त्याचे लाख रुपयांचे नुकसान झाले. तेव्हा प्रश्न पडतो कुठे गेले पोलीस? तिकडे पंढरपूरमध्ये एक आत्महत्या दाखविल्या गेली. फोटो असा की, त्या तरुणांचे पाय जमिनीला टेकत आहेत. त्याने सोशल मीडियावर काही तरी लिहले नंतर त्याने माफीसुद्धा मागितली. दुसऱ्या दिवशी सांगितले की त्याने आत्महत्या केली. पण तो मुलगा अपंग होता अपंग, तो त्या झाडावर चढलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात गाव बंदी, आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गाव बंदी, काय रे हा महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का रे? असे म्हणतच मला फोन करून सांगता की, साहेब आमचे बोर्ड फाडले, मग तुमचे हात कुठे गेले? जशास तसे उत्तर द्यावे लागेल. मी सांगितले होते की, करेंगे या मरेंगे, पण हा तुमचा पावना म्हणते बघा हा हिंसाचार आहे. करेंगे या मरेंगे हे महात्मा गांधींचे वाक्य आहे. आणि ते म्हणतात की लढेंगे और जितेंगे अरे वारे वा.

हेही वाचा : भुजबळ भावूक होऊन म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC समाजावर संकट आलं नसतं’

- Advertisement -

गाव बंदीचे फलक हटवा अन्यथा…

पोलिसांना माझे आवाहन आहे की, गाव बंदीचे फलक तत्काळ हटवा, हे लोकशीहीचे राज्य आहे. मुख्यमंत्र्याना, उपमुख्यमंत्र्याना सांगणं आहे. आज आमदार, मंत्री गावात यायचं नाही. सरकार आहे की नाही? कायदा आहे की नाही? ओबीसीच्या जोडीला दलित, मुस्लिम आदिवसी हे सगळे एकवटल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही दादागिरी बंद करू. मला रोज धमक्या, शिविगाळ, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमक्या, घाणघाण शिव्या आणि म्हणतात की, येवल्यात कसा निवडणून येतोय ते बघतो असे म्हणणाऱ्यांना काय बघतो तो तू असे म्हणत छगन भुजबळ यांनी धमकी देणाऱ्याना चोख प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा : कुत्रा चावल्यास मिळणार 10 हजार; मोठ्या जखमेला 20 हजार; वाचा सविस्तर

हम आहं भी भरते है तो…

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मला म्हणतात भडकावू भाषण देऊ नका, दोन महिन्यात मी कधी भडकावू भाषण केलं? त्यांनी केलं तर चालतं का? असे म्हणत ते म्हणाले की, हम आहं भरतो है तो बदनाम हो जाते है
ओ कत्ल भी करते है तो चर्चा नही होती असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -