घरमहाराष्ट्रनागपूरकुणी औरंग्याचे नाव घेत असेल तर...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

कुणी औरंग्याचे नाव घेत असेल तर…; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, असे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आधी औरंगाबाद, त्यानंतर उस्मानाबाद आणि आता अहमदनगर या जिल्ह्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत. ज्यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर असे नामांतर करण्यात आले, त्यावेळी या जिल्ह्यातील एका गटाकडून या नावाला विरोध करण्यात आला. यामुळे शहरात काही दिवसांसाठी अशांततेचे वातावरण पसरलेले होते. पण पुन्हा एकदा छत्रपती संभाजी नगरमध्ये असंतोष पसरवण्याचे काम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरूण हातात औरंगजेबाचा फोटो नाचताना दिसत आहे.

हेही वाचा – भाजप नगरसेवकाने शिवसेना खासदाराला म्हटले गद्दार, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

- Advertisement -

सोशल मीडियावर या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजी नगरमधील फकिरवाडी येथे निघालेल्या उरूसमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. पण याबाबत पत्रकारांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विचारले असता, त्यांनी आपले मत व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली. जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, असे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे मान्य केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही.”

- Advertisement -

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत देखील माहिती दिली. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मंत्रीमंडळ विस्तार होणारच आहे. तो केव्हा होणार, हे मुख्यमंत्री ठरवतील आणि सांगतील”, असं ते म्हणाले. तसेच “अमित शाहांबरोबर झालेल्या बैठकीत सर्व निवडणुका एकत्र लढायच्या, दोन्ही पक्षांमध्ये तालुका स्तरापर्यंत समन्वय घडवायचा, अशी चर्चा झाली”, असे फडणवीसांकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -