सरकारला लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा : प्रवीण दरेकर

सध्या ठाकरे सरकारची प्रायोरिटी ही केवळ सरकार टिकविणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मलिक यांचा राजीनामा घेतला नाही व जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला तर आम्ही सरकारसोबत राहणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली तर मुख्यमंत्रीच राहणार नसेल व सरकार राहणार नसेल तर राजीनामा घेउन काय करणार अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था झाली असावी.

bjp press pravin darekar slams thackeray government we will also give reaction on political happened
ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो, आमचे हात बांधले नाही, दरेकरांचा शिवसेनेला स्पष्ट इशारा

महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas aghadi) थोडीही लाज शरम असली तर सरकारने तात्काळ नवाब मलिक (nawab malik) यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही नवाब मलिक यांच्यावरुन राजकारण करीत होतो असे बोलणाऱ्यांना सडेतोड उत्तरच विशेष न्यायालयाच्या (Special Court) निरिक्षणावरुन मिळाले आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आज केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी विधीमंडळात पुराव्यानिशी नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी झालेले व्यवहार, डी गॅंगशी असलेले संबंध याची तपशिलवार माहिती दिली होती व मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु आपली सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (ncp) दबावाखाली उध्दव ठाकरे यांनी मलिक यांचे समर्थन केले व त्यांचा राजीनामा घेतला नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – “आधी किमती वाढवायच्या…”; पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीवर मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारवर पलटवार

सध्या ठाकरे सरकारची प्रायोरिटी ही केवळ सरकार टिकविणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मलिक यांचा राजीनामा घेतला नाही व जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला तर आम्ही सरकारसोबत राहणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली तर मुख्यमंत्रीच राहणार नसेल व सरकार राहणार नसेल तर राजीनामा घेउन काय करणार अशी मुख्यमंत्र्यांची अवस्था झाली असावी. आज जर खरेच शिवसेनाप्रमुखांचा ठाकरी बाणा दाखवायचा असेल व आपली प्रतिमा सांभाळायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेण्याचे धाडस दाखवावे. पण मला असे अजिबात वाटत नाही की मुख्यमंत्री अशा प्रकारचे धाडस करतील, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.


हेही वाचा – जातीवाचक बोलणाऱ्या नेत्यांना समज दिलीये; शरद पवारांचे ब्राम्हण संघटनांना आश्वासन