सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल होण्याची इच्छा, म्हणाल्या, पक्षाने ठरवले…

if the party decides it would like to be guardian of maharashtra hints sumitra mahajan

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून राज्याचे नवे राज्यपाल कोण होणार यावरून बऱ्याच चर्चा रंगतायत. यात गेल्या काही दिवसांपासून भाजपवासी असलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. यानंतर गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, भाजपचे मध्य प्रदेशातील नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यादेखील राज्यपाल पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्द सुमित्रा महाजन यांनीच एका कार्यक्रमात त्यांना महाराष्ट्राचं राज्यपाल व्हायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे.

पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल, पण आता वय झाले आहे. त्यातही नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचे सूचक विधान सुमित्रा महाजन यांनी केलं आहे. डोंबिवलीमध्ये आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान- प्रदान सोहळ्यातील मुलाखतीमध्ये त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वोच्च प्रमुख सुमित्रा महाजन यांनी संधी देणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

दरम्यान या कार्यक्रमात महाजन यांनी आल्या लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यकाळातील काही आठवणी देखील शेअर केल्या. सुमित्रा महाजन म्हणाल्या की, लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यावर जबाबदारी वाढली. अशावेळी कशाप्रकारे अभ्यास केला याचाही अनुभव त्यांनी सांगितला. यावर त्या पुढे म्हणाल्या की, देशाची प्रगती साधण्याची जबाबदारी केवळ राजकीय नेत्यांची नाही, तर नागरिकांचीही आहे. आपण निवडून दिलेला नेता चुकीचं वागत असेल, तर मतदारांनी त्याला त्याची जाणीव करुन दिली पाहिजे. आजकाल देवालाही वाटून घेतले जाते. तसेच मोठ्या माणसांनाही वाटून घेतले जात आहे. हा चुकीचा पायंडा आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते वादात सापडले आहेत. कधी महापुरुषांचा अपमान तर कधी मुंबईकरांची अवहेलना या मुद्यावरून कोश्यारी विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले, मात्र मविआने सादर केलेली राज्यपालनियुक्त आमदारांची यादी प्रलंबित ठेवण्यापासून ते शिंदे यांच्या बंडानंतर भाजपच्या सत्तास्थापनेत कोश्यारींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. यादरम्यान विरोधकांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली. यामुळे 31 जानेवारीपासून सुरू होणार्‍या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


उजनीचा उजवा कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली, नेमकं काय घडलं?