घरमहाराष्ट्रआज चिन्हाबाबत निकाल आला तर तो न्याय्यच असेल; ठाकरे गटाचे खासदार अनिल...

आज चिन्हाबाबत निकाल आला तर तो न्याय्यच असेल; ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचा विश्वास

Subscribe

शिवसेना कोणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? मुळ धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख पदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे कार्यकारिणीची बैठक घेण्यास परवानगी द्यावी किंवा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे केली आहे. या दोन्ही मुद्द्यावर आज दुपारी ४ वाजता महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सुनावणीपूर्वी आज ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. आज निकाल लागला तर तो न्यायचं असेल असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.

अनिल देसाई म्हणाले की, या प्रकरणावर सुनावणी सुरुचं आहे. यापूर्वी १० तारखेला झाली आणि आज होत आहे. आज आमचे वकिल आपली बाजू मांडतील. जो एक मुद्दा किंवा ज्याप्रमाणे गेल्या वेळेला त्यांच्या वकिलांनी मांडलेले सर्व मुद्दे खोडून काढले जातील, कारण त्यात काहीचं तथ्य नाही, कायद्याचं ज्ञान असू द्या किंवा कॉमनसेन्सने पाहिलं तरी कळतं कशी दांभिकता त्यात होती. खोटी बाजू मांडण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टींचं निराकरण होईल. इलेक्शन कमिशन आणि चीफ इलेक्शन कमिशनर ऐकतील आणि झाला तर निर्णय करतील. निकाल आला तर तो न्यायच असेल, आम्ही न्याय मिळेल अशी खात्री आहे, असा विश्वास देसाईंनी व्यक्त केला.

- Advertisement -

बेकायदेशीर लोकं नेहमी स्वत: कायदेशीर असल्याचा दावा करतात, त्यामुळे त्यांच्या वकिलांनी मांडलेल मतचं हास्यास्पद आहे. ते म्हणतात आम्ही हे केलं ते केलं. पण शेवटी घटना आमचीच घेतली, घटना मुळ संघटनेची घेतली, असा आरोपही पुन्हा अनिल देसाईंनी केला आहे.

पक्ष प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी दोन पत्र दिली होती. पक्ष प्रमुखांचा कार्यकाळ संपत आलेला आहे त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती मुभा द्यावी, ती मुभा जर काही अडचणींमुळे देत नसतील तर कार्यकाळ वाढवण्यासाठी निर्णय द्यावा, अशी मागणी पुन्हा अनिल देसाई यांनी केली आहे.


ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं; मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर झळकावले शिंदे-फडणवीसांचे मोठे कटआऊट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -