घरमहाराष्ट्र'हे गतिमान नाही तर, हत्यारे सरकार!' आरोग्य समस्येवरुन विजय वडेट्टीवारांनी डागली तोफ

‘हे गतिमान नाही तर, हत्यारे सरकार!’ आरोग्य समस्येवरुन विजय वडेट्टीवारांनी डागली तोफ

Subscribe

वडेट्टीवार यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला.

नांदेड : नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. सत्तेत सहभागी होऊन तीन महिने उलटले तरी पालकमंत्री पदाचे वाटप होत नसल्याने पवार नाराज होते. सरकारने कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत या रुगणांच्या वाढत्या मृत्यूच्या घटनेकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता होती मात्र तसे काही झाले नाही. आमदार सांभाळून ठेवण्यासाठी कोटी रुपयांची उधळण करणाऱ्या लुटारू सरकार रुग्णालयाला औषध खरेदीसाठी दहा कोटी रुपये देऊ शकत नाहीत का? असा सवाल उपस्थित करत सरकारच्या नाकर्तेपणामुळे नांदेडमधील रुग्णालयात हत्या झाल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (If this is not dynamic murderous government! Vijay Wadettiwar fired a cannon over the health problem)

वडेट्टीवार यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेलेत्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, माणुसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेनशीलतेने हे सगळं पाहू शकत नाही, स्वतःचे अश्रू थांबवू शकणार नाही अशी स्थिती नांदेड शासकीय रुग्णालयात आहे. हृदय पिळून टाकणाऱ्या घटना शासकीय रुग्णालयात घडत आहे. पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे एक कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. यात नवजात बालकांचा काय दोष आहे? असा सवाल करत जे कुटुंब उध्वस्त झाले त्यांना सरकारने आतातरी माणुसकी दाखवत प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत तातडीने करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

- Advertisement -

50 पेक्षा अधिक जागा रिक्त

त्रिकूट सरकारवर तोफ डागत वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आरोग्ययंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. आधी ठाणे, नांदेड, नंतर छत्रपती संभाजीनगर आणि आता नागपूरच्या शासकीय रुग्णालयातही मृत्यूसत्र सुरू झाले आहे. आम्हाला अपेक्षा होती कळवा प्रकरणानंतर शासन बोध घेईल मात्र शासनाने आरोग्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. नांदेडमध्ये झालेल्या 41 रुग्णांचे मृत्यू हे सरकारच्या अनास्थेमुळे झालेली हत्या आहेत. शासनाने औषधासाठी हाफकिनकडे पैसे दिले. त्यांनी औषध खरेदी केली नाही, 50 पेक्षा अधिक डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे सेवा कमी पडत आहेत. त्या जागा का भरल्या गेल्या नाहीत असा परखड सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

अरे माणसांच्या जीवाची किंमत आहे की नाही?

रुग्णालयात फक्त 70 लाख औषध उपलब्ध होते. तेवढेच औषध खरेदी झाले. दररोज 1200 रुग्ण दाखल होतात. औषध खरेदीला प्राधिकरण बनवले, त्यांनी पण आठ महिने काही केलं नाही. सचिवापासून सर्व यंत्रणा करतेय तरी काय? म्हणत राज्यसरकारवार ताशेरे ओढले. घटनांमागून घटना घडत असल्याने हे समोर येत आहे. असे किती तरी जीव व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकून रोज मृत्यूच्या जबड्यात जात आहेत. अरे माणसांच्या जीवाची किंमत आहे की नाही? सरकार इतके निष्ठूर कसे होऊ शकते? असा सवाल करत नांदेडमधील घटनेवरून वडेट्टीवार यांनी टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यात मृत्यूतांडव… यांचा मात्र दिल्लीदौरा; मुख्यमंत्र्यांना शरम वाटते का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

हे रुग्णालय की स्मशानभूमी?

निर्णय वेगवान, गतिमान सरकार असे ब्रीद सरकारने अंगीकारले आहे. एकीकडे सरकार गतिमान असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र परस्थिती वेगळी असून, हे ‘गतिमान’ नव्हे तर हत्यारे सरकार आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात लोकांचा बळी गेला त्यात नवजात बालकांची संख्या जास्त आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे हे सगळ घडत आहे. सरकारनेच या सगळ्यांचा बळी घेतला आहे. याला रूग्णालय न म्हणता स्मशानभूमी म्हणाव का असा प्रश्न पडल्याचं वडेट्टीवार यांनी नमूद केलं. हसन मुश्रीफ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत हा नालायक सरकारचा नाकर्तेपणा असून केवळ बदल्या आणि टेंडरमध्ये 20 टक्के वसूली सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा : पाकिस्तान टीमचे भारतात Grand Welcome पाहून भारावला बाबर आझम; म्हणाला-

मर्जीतील लोकांना दिले जातात टेंडर

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राची सकाळ अशा दुःखद बातम्यांनी होत आहे. आणखी किती जिल्ह्यांच्या बाबतीत अशा दुःखद बातम्या पुढे येतील ही चिंता व्यक्त करत ट्रीपल इंजिन सरकारने सर्व शासकीय रुग्णालये हे अक्षरशः भंगारखाणे करून ठेवले असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. दरम्यान, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना शौचालय साफ करायला लावल्याचे समोर आले आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. वडेट्टीवार म्हणाले, शासकीय रुग्णालयातील सफाई कामगार भरतीसाठी काढलेले टेंडर मंत्रालय स्तरावरूनतीन वेळा रद्द करण्यात आले. मर्जीतल्या कंपन्यांना कंत्राट दिले जात नाही म्हणून ते रद्द करतात. आणि इकडे सत्ताधारी खासदार स्टंटबाजी करत डॉक्टरांना शौचालय धुवायला लावतात. घाण तर महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. आणि 2024 मध्ये ही घाण साफ होणार असल्याचा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -