घरमहाराष्ट्रपुणेआम्ही अमेठी जिंकू शकतो, तर बारामती का नाही; राम शिंदेंचा सुप्रिया सुळेंना...

आम्ही अमेठी जिंकू शकतो, तर बारामती का नाही; राम शिंदेंचा सुप्रिया सुळेंना टोला

Subscribe

पुणे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौर्‍यावर येत असून बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी आमदार राम शिंदे यांच्याकडे जबाबदारी आहे. या दौर्‍याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी अनेक राजकीय प्रश्नावर त्यांनी उत्तर दिली. तर यावेळी राम शिंदे म्हणाले की, कोणाचा तरी बालकिल्ला वाटत असेल पण आम्ही जो देशात बालकिल्ला (अमेठी) होता. तो आम्ही खेचून आणला. त्यामुळे हा बालकिल्ला नाही. आम्ही अमेठी जिंकू शकतो. तर बारामती का नाही, अशी भूमिका भाजपचे नेते आमदार राम शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तर पंरतु कोणी जर असा दावा करीत असेल की, इथे आमचाच बालकिल्ला आहे आणि आम्हीच जिंकू, तर तो दावा स्पेशल फेल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – पुण्यात अपघातांची मालिका थांबेना! शिवशाही बस आणि कंटेनरच्या धडकेत 1 ठार, 6 जखमी

- Advertisement -

यावेळी राम शिंदे म्हणाले की, बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही 40 गावांना पाण्यापासून दूर आहेत. तसेच काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडलेला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात. यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करीत असून सर्व सामान्य जनतेला जाऊन विचारल. तर समजले की, विकास झालेला पाहण्यास येत आहोत की, भकास झालेला पाहण्यास येत आहे. हे येणाऱ्या काळात निश्चित त्यांना कळेल, असा टोला अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना त्यांनी लगावला.

हेही वाचा – ‘काँग्रेसचे अस्तित्व कमी-कमी होत चालले’; काँग्रेसच्या बेरोजगारी दिवसाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

- Advertisement -

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील अडीच वर्षात स्वतः च्या मतदार संघात फिरल्या नाहीत. पण आता निर्मला सीतारामन येणार असे समजताच घरोघरी जाऊन फिरत आहे. त्यामुळे येण्याअगोदर त्या घाबरल्या आहेत. हे स्पष्ट होत असल्याचे सांगात सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -