Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मिंध्यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढणार का? हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या;...

मिंध्यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढणार का? हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

Subscribe

भाजप नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आता निवडणुका घ्याव्यात. तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे ते! असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावमधील जाहीर सभेत भारतीय जनता पक्षाला दिले आहे.

मालेगाव (नाशिक) – भाजप नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आता निवडणुका घ्याव्यात. तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे ते! असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावमधील जाहीर सभेत भारतीय जनता पक्षाला दिले आहे.
भाजपने जाहीर करावे की ते मिंध्यांच्या नेतृत्वात लढायला तयार आहे का? असाही खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तयार केलेल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप मिंध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार का? हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही मिंध्यांना ४८ जागा देणार. यावरुन ठाकरेंनी बावनकुळेंना, निदान तुमच्या आडनावाएवढ्या तरी जागा त्यांना द्या, असा टोला लगावला.

हेही वाचा : शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही; उद्धव ठाकरेंची टीका

- Advertisement -

शिवेसना ही कोणीही तोडू शकणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपला निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले आहे. ते म्हणाले, तुमचे ५२ काय १५२ कुळे जरी खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करणे शक्य नाही. आज निवडणुका घ्या, तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने कौल देते ते.

हेही वाचा : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत काँग्रेस अन् राहुल गांधींना सुनावले

- Advertisement -

भाजपामध्ये आज अनेक भ्रष्ट माणसे आली आहेत, त्यांच्यासोबत चांगली माणसे कशी बसू शकतील, असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला. भाजपवाल्यांकडे गुजरातचा निरमा वॉशिंग पावडर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे माणूस स्वच्छ होतो, असं ते सांगतात. त्यामुळेच गद्दारांना आधी त्यांनी गुजरातला नेलं असावं, तिथे त्यांना स्वच्छ केलं. काय-काय धुतलं माहित नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना आणि भाजप नेत्यांना लगावला.

- Advertisment -