घरमहाराष्ट्रहृदयात सावरकर असते तर..., 'वाचू का' विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टोला

हृदयात सावरकर असते तर…, ‘वाचू का’ विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टोला

Subscribe

मुंबई – वीर सावरकरांच्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काल पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींचा (Congress Leader Rahul Gandhi) निषेध व्यक्त करण्याकरता आणि सावरकर गौरव यात्रेची माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद होती. नियमानुसार, या यात्रेची माहिती देण्याकरता मुख्यमंत्री बोलू लागले. मात्र, बोलण्याआधी त्यांनी फडणवीसांची परवानगी घेतली. एवढंच नव्हे तर कागदावर जे लिहून आणलं होतं ते मुख्यमंत्री वाचून दाखवत होते. त्यांच्या या कृतीमुळे ते राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – आम्ही सारे सावरकर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेने बदलला डीपी

- Advertisement -

आता झाले ना ९ महिने! बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते इतक्या दिवसात. कागद वाचायचा निर्णय घेण्यासाठी पण अजूनही ‘सुपर सीएम’च लागतात का तुम्हाला? नुकताच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहिला होता, आज मुंबईत पण असाच एक शो झाला म्हणे!, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

तर, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कागद वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयात सावरकर असते तर त्यांनी उत्स्फूर्तपणे मानवंदना द्यायला हवी होती. पण ते उपमुख्यमंत्र्यांना विचारतात वाचू का, यालाच गुलामी म्हणतात, असं टीकास्त्र राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी डागलं.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

याआधी अनेकदा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बोलण्यास सुरुवात केली आहे. भर विधानसभेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना प्रॉम्प्ट करताना दिसले. त्यामुळे सत्तेत बसून आता जवळपास वर्ष होत आले तरीही मुख्यमंत्री स्वतःची ठाम भूमिका मांडू शकत नाहीत का? असा प्रश्न त्यांच्या विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचा आज माईक ओढला, उद्या पँट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -