मुंबई : मुंबईपासून जवळपास 300 किमी. अंतरावरील सौंदाळा येथील ग्रामस्थांनी एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेत अनोखा ठराव केला आहे. महिलांना त्यांचा मान, सन्मान मिळवून देण्यासाठी हे टाकलेले हे पाऊल आहे. (if you use abusive language in this maharashtra village you will have to pay a heavy fine know why the gram panchayat took this decision)
भांडणात वगैरे शिव्या देणे हे अलीकडे सर्रास आहे. पूर्वीप्रमाणे शिवीगाळ करणे, हे काही फारसे असभ्यपणाचे मानले जात नाही. दरम्यान, राज्यातील एका गावातील लोकांनी या शिवीगाळीपासून वाचण्याचा एक वेगळाच फंडा अवलंबला आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
महाराष्ट्रातील या गावातील ग्रामस्थांनी शिवीगाळीपासून लांब राहण्याचे ठरवले आहे. आणि काहीही झाले तरी अपशब्दांचा वापर करायचा नाही, हे देखील त्यांनी ठरवलेले आहे. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने यासंबंधी ठराव केला असून कोणीही शिवीगाळ केल्यास त्याला 500 रुपयांचा दंड होणार आहे.
या गावाचे सरपंच शरद अरगडे यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, सौंदाळा ग्रामसभेने महिलांचा मान – सन्मान जपण्यासाठी शिव्या देण्याविरोधात एक ठराव पारित केला आहे. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ ते म्हणाले की, कोणत्याही भांडणादरम्यान आई – बहिणींवरून शिव्या घालणे हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळेच आम्ही हा ठराव केल्याचे त्यांनी सांगितले.
अशा अपशब्दांचा वापर करणाऱ्यांना कायमच या गोष्टीचा विसर पडतो की, ते दुसऱ्यांना आई – बहिणीवरून शिव्या घालतात, त्या त्यांच्या घरातील महिलांना देखील लागू होतात. त्यामुळेच यावर बंदी घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. समाजात महिलांना सन्मानजनक स्थान देण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Maharashtra CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव…; काय म्हणाले मुरलीधर मोहोळ
अन्य रुढींना देखील सारले बाजूला
अरगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदाळा गावाने अनेक जुन्या चालीरिती बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथील विधवांना सर्व सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी आहे. तसेच विधवांनी कुंकू न लावणे, मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे अशा गोष्टींना देखील बंदी आहे. यापूर्वी या गावाने 2007 मध्ये तंटामुक्त गावाचा राज्यस्तरीय पुरस्कार जिंकला होता. (if you use abusive language in this maharashtra village you will have to pay a heavy fine know why the gram panchayat took this decision)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar