‘विधान परिषदेसाठी मतदान करायचं असेल तर नवी याचिका दाखल करा’

नवाब मलिक यांनी यापूर्वी राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. याला ईडीने विरोध केला होता. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी नवाब मलिकांना परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

nawab malik

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering case) न्यायलयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायलयाने (Mumbai High court) नकार दिला आहे. त्यामुळे येत्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना मतदान करता येणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, विधान परिषदेसाठी मतदान करायचं असेल तर नवी याचिका दाखल करा, असं न्यायालयाने म्हटलं आहे. (If you want to vote for Legislative Council, file a new petition, high court directs Nawab Malik)

हेही वाचा – विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार, काँग्रेस आणि भाजपात होणार लढत

नवाब मलिक यांनी यापूर्वी राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. याला ईडीने विरोध केला होता. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी नवाब मलिकांना परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्यात यावा अशी मागणी मलिक-देशमुख यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. यानंतर पुन्हा नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. राज्यसभेसाठी दोघांनाही कोर्टाने परवानगी नाकारली होती. याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा – इम्पिरिकल डेटा गोळा करताना सरकारकडून चूक, ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होणार; फडणवीसांचा इशारा

विधान परिषद निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडीला फटका बसू नये यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी याचिका केली. मलिकांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. तर अनिल देशमुखांच्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी होणार आहे.

याचिकेवर सुनावणी करण्यास का नकार दिला?

“ती राज्यसभा निवडणूक होती. त्यात विशेष पीएमएलए कोर्टाच्या आदेशाविरोधात तुम्ही (मलिक) याचिका केली होती. ती निवडणूक संपल्याने आता ती याचिका निरर्थक झाली आहे. त्यामुळे त्याच याचिकेत भरीव दुरुस्ती करून सुनावणीची तुमची विनंती मान्य होऊ शकत नाही. ही याचिका मागे घेऊन नव्याने याचिका करा”, अशा सूचना न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी मलिकांच्या वकिलांना केल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मागणारा विषय निरर्थक ठरल्याने मंत्री नवाब मलिक यांनी आधीची याचिका मागे घेतली आणि नव्याने याचिका करण्याची उच्च न्यायालयाकडून मुभा मिळवली आहे.


हेही वाचा : अजित पवार शब्दाचे पक्के, त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे, भाजपच्या नेत्याची ऑफर