घरताज्या घडामोडीअफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणावर हातोडा; पहाटेपासून कारवाईला सुरुवात

अफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणावर हातोडा; पहाटेपासून कारवाईला सुरुवात

Subscribe

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळ अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार असून, त्या संदर्भातील कारवाईला सुरूवात झाली आहे. त्यानुसार, आता कोणत्याही क्षणी अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवले जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळ अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार असून, त्या संदर्भातील कारवाईला सुरूवात झाली आहे. त्यानुसार, आता कोणत्याही क्षणी अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवले जाणार आहे. याकरीता पोलीस प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. (Illegal Construction Removed From Afzalkhan Kabar On Pratapgad Decision of Shinde Fadnavis Government at Pratapgad)

मिळालेल्या माहितीनुसार, अफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणाचा वाद 1990पासून सुरू होता. अफझलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणे केली जात होती. दर्गा बांधण्यात येत होता. तसेच, अफझलखानाचे दैवतीकरण केले होते. तसा आरोपही 1990 सालीच करण्यात आला होता. या आरोपानंतर सुरू झालेला वाद अद्याप सुरूच आहे.

- Advertisement -

याप्रकरणी न्यायालयाने 2017 साली निर्णय देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर अद्याप कारवाई झाली नव्हती. मात्र, आता ही कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी रात्रीपासूनच गुप्तपणे या हालचालींना वेग आला होता. आता ही अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात होत आहे. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली जात आहे.

1980 ते 85 या कालावधीत अफझलखानाच्या कबरीजवळ अतिक्रमण व्हायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते. याठिकाणी उरूसही भरवण्यात आला होता. त्यानंतर या कबरीचे दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी! अजितदादा पुन्हा नॉट रिचेबल; 4 नोव्हेंबरपासून कुणाच्याही संपर्कात नाहीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -