घरमहाराष्ट्रअंबा नदीतून अवैध पाणी उपसा

अंबा नदीतून अवैध पाणी उपसा

Subscribe

जनतेकडून कारवाईची मागणी

शहरासह तालुक्याला पाणी पुरवठा करणार्‍या अंबा नदीतील जलसाठा हळूहळू कमी होत असून संभाव्य पाणी टंचाईमुळे जनता चिंता व्यक्त करीत आहे. तर दुसरीकडे नदीतील पाण्याचा अवैधपणे उपसा करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

अंबा नदीची पहिल्यांदाच पाण्याची पातळी खाली गेली असून नदीवरील बंधार्‍याची दुरुस्ती लवकर करणे गरजेचे होते. तसेच बंधार्‍याचे दरवाजे त्यावेळी बंद केले असते तर ही अडचण भासली नसती. त्यात वीट व्यावसायिक, भाजीपाला, कलिंगड लागवड करणारे शेतकरी पाण्याचा भरमसाठ वापर करीत आहेत. त्यावर एक रुपयाही कर भरला जात नाही. याशिवाय टँकरमधून पाणी विक्री करणारेही राजरोसपणे कोणतीही परवानगी न घेता पाण्याचा उपसा करीत आहेत.अवैध पाणी उपसा व पाण्याची कमी झालेली पातळी यामुळे संभाव्य पाणी टंचाईचा धोका ओळखून ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले आहे. हा विषय गांभीर्याने हाताळण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

अवैधरित्या पाण्याचा उपसा करणारे वीटभट्टी मालक, पाण्याचे टँकरवाले यांच्यावर पाटबंधारे विभागाकडून कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अंबा नदी पात्रातील पाण्याचा उपसा होणार नाही.
-प्रकाश पालकर, ग्रामस्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -