Homeदेश-विदेशIltija Mufti : "हिंदुत्व" प्रकरणी मेहबूबा मुफ्तींच्या मुलीकडून अपमानास्पद टिप्पणी; भाजपाकडून अटकेची...

Iltija Mufti : “हिंदुत्व” प्रकरणी मेहबूबा मुफ्तींच्या मुलीकडून अपमानास्पद टिप्पणी; भाजपाकडून अटकेची मागणी

Subscribe

इल्तिजा मुफ्ती यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भगवान राम यांनी शरमेने डोके झाकले पाहिजेत, तसेच हिंदुत्व एक आजार आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याप्रकरणी भाजपाने इल्तिजा मुफ्ती यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती या वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत ‘हिंदुत्व’चा उल्लेख करताना अपमानास्पद टिप्पणी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. इल्तिजा मुफ्ती यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भगवान राम यांनी शरमेने डोके झाकले पाहिजेत, तसेच हिंदुत्व एक आजार आहे. याप्रकरणी भाजपाने इल्तिजा मुफ्ती यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. (Iltija Mufti makes derogatory remarks referring to Hindutva)

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर जवळपास दशकभरानंतर त्या ठिकामी ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा निवडणुका पार पडली. या निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिला आपल्या कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या श्रीगुफ्वारा-बिजबेहरा विधानसभा मतदारसंघातून 9770 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता इल्तिजा मुफ्ती या त्यांच्या विधानाने चर्चेत आल्या आहेत.

हेही वाचा – Farmers Protest : पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने शेतकऱ्यांकडून आजचे आंदोलन स्थगित

शिरीन खान नावाच्या युजरने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘मुस्लिम अल्पवयीन मुलांवर क्रूर हल्ला करण्यात आला असून त्यांना ‘जय श्री राम’ म्हणण्यास भाग पाडले गेले. या गुन्हेगारांवर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. दरम्यान, शिरीन खान हिने ट्वीट केलेला व्हिडीओ खरा की खोटा याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र इल्तिजा मुफ्ती हिने हा व्हिडीओ रिट्वीट करत म्हटले की, भगवान राम यांनी शरमेने डोके झाकले पाहिजेत, कारण अल्पवयीन मुस्लीम मुलांना चप्पलने मारले जात आहे. कारण काय तर ते रामाचे नाव घेण्यास नकार देत आहेत. खरं तर हिंदुत्व हा एक असा आजार आहे, ज्याने लाखो भारतीयांना ग्रासले आहे. त्या माध्यमातून देवाच्या नावाचा अपमान केला जात आहे.

हेही वाचा – Syria Government : देशातून पळून जाताना राष्ट्रपती असद यांचा मृत्यू? विमान रहस्यरित्या गायब झाल्याची माहिती

भाजपाकडून अटकेची मागणी

दरम्यान, इल्तिजा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार टी राजा सिंह संतापले आहेत. त्यांनी म्हटले की, मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही त्यांच्या धर्मावर कोणतेही विधान केले, तर त्यांना कसे वाटेल? त्यांचे विधान हिंदूंच्या भावनांच्या विरोधात आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी आणि त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कुणीतरी कुठेतरी कुणाला चप्पल मारत आहे. त्यासाठी इल्तिजा मुफ्ती देवांवर भाष्य करतात. पण काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले. तेव्हा त्यांनी काहीच का नाही म्हटले? असा प्रश्न टी राजा सिंह यांनी उपस्थित केला आहे.


Edited By Rohit Patil