निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलले

संसदेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयाचे चित्र बदललेले पाहायला मिळत आहे. याआधी संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात मध्यभागी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो तर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकते यांचा फोटो होता. हे फोटो आता हटविण्यात आले आहेत.

image of the Shiv Sena office in Parliament changed after the decision of the Election Commission

संसदेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयाचे चित्र बदललेले पाहायला मिळत आहे. याआधी संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात मध्यभागी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो तर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकते यांचा फोटो होता. हे फोटो आता हटविण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेच्या गल्ली ते दिल्लीपर्यंत अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या आधीच्या कार्यालयांवर शिवसेना (शिंदे गट) यांनी स्वतःचा हक्क सांगितला आहे. पण आता तर थेट संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयातीलच चित्र बदललेले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेतील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे चित्र बदललेले आहे. संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात मध्यभागी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह त्यांच्या आजूबाजूला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. पण हे फोटो काढण्यात आले आहेत. तर या ठिकाणी आता एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एका बाजूला आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

संसदेच्या शिवसेनेच्या कार्यालयातील या बदलामुळे ठाकरे गटाकडून शिवसेनेवर नेमका काय हल्लाबोल करण्यात येतो, हे पाहावे लागणार आहे. तर शिवसेनेतील हा बदल आता आणखी किती बदल करण्यास भाग पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध ठाकरे गट यांच्यामधील सत्तासंघर्षाच्या वादावर देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

हेही वाचा – कांदा उत्पादकांबाबत सरकारची भूमिका काय?, अंबादास दानवेंचा सवाल

निवडणूक आयोगाने दिलेल्या आतापर्यंतच्या महत्वपूर्ण निर्णयानंतर गल्ली ते दिल्ली फरक दिसू लागलेला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे यांनी ताबा घेतला त्यानंतर आता हा बदल दिसून आलेला आहे. आधी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. आधीच्या रचनेतून या दोघांचे फोटो काढून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे.