घरताज्या घडामोडीमुंबईसाठी हवामान विभागाचा 'ऑरेंज' एलर्ट

मुंबईसाठी हवामान विभागाचा ‘ऑरेंज’ एलर्ट

Subscribe

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईसाठी ऑरेंज एलर्ट म्हणजे अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. येत्या २४ तासांमध्ये मुंबई तसेच परिसरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागामार्फत मांडण्यात आला आहे. मुंबईत संपुर्ण जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कमबॅक करेल. तसेच जुलै महिन्यात पावसाचा अनुशेष भरून काढेल असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जून महिन्यात राज्यात इतर ठिकाणी पुरेसा मॉन्सूनचा पाऊस पडलेला असला तरीही मुंबईत मात्र पावसाने दडी मारली होती. संपुर्ण कोकण परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. पण जुलै महिन्यात पावसाचे जोरदार कमबॅक होईल असे हवामान विभागााच्या शास्त्रज्ञ डॉ शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले आहे. कोकणासह मुंबईतही पावसाचे जोरदार आगमन होईल असे त्यांनी सांगितले. मुंबईत तसेच कोकणा येत्या २४ तासांमध्येही मुंबई, ठाणे, पालघर याठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. याबाबतचा ऑरेंज एलर्टही हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -