Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Monsoon Update : मुंबईसह कोकणातील दोन जिल्ह्यांना IMD चा Red Alert !

Monsoon Update : मुंबईसह कोकणातील दोन जिल्ह्यांना IMD चा Red Alert !

Related Story

- Advertisement -

मुंबईत सकाळीच झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह नजीकच्या परिसरातील भागाचे जनजीवन विस्कळीत झाले. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने शनिवार आणि रविवारसाठी हवामानाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याचे आयएमडी मार्फत स्पष्ट करण्यात आले. मुंबईसह कोकण परिसरात हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात कोसळण्याची शक्यता आहे. कोकणात रत्नागिरी आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयएमडी मार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईत सकाळच्या सुमारास अवघ्या तीन तासांमध्ये ७० मिमी ते १०० पर्यंत पावसाची नोंद अवघ्या काही मिनिटातच झाली. मुंबईत शनिवारी सकाळच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे सायन आणि माटुंगा यासारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पावधीतच पाणी साचले. मुंबईत विकेंडला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. येत्या सोमवारपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता असल्याचे आयएमडी मार्फत स्पष्ट करण्यात आले. मुंबई आणि कोकणासह विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई परिसरामध्ये ठाणे, रायगड तसेच घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत येत्या २४ तासांसाठी वर्तवण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये पालघरमध्ये १४४.५ मिमी, चिपळूनमध्ये ६२ मिमी, गुहाघर ९७ मिमी, दापोली ८३ मिमी अशी पावसाची नोंद झालेली आहे. तर कोकणासाठी काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आयएमडीने जारी केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आगामी ४८ तासांसाठी हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे असेही आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे. ठाण्यासह नवी मुंबईतही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -


 

- Advertisement -