राज्यात पुढील ४ ते ५ दिवस ‘मुसळधार’; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

monsoon update heavy rains expected in maharashtra for next 5 days imd alert

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा (Heavy rainfall) इशारा दिला आहे. सध्यस्थितीत राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आगामी 4 ते 5 दिवस राज्यात (Heavy Rain) मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज (IMD) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. (imd heavy rainfall alert for next 4 to 5 days in maharashtra)

योग्य पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग

राज्यात 1 जुलैपासून सुरु झालेला पाऊस 18 जुलैपर्यंत कायम होता. गेल्या 5 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच, योग्य पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला होता. परंतु, आता 23 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा धोका कायम असून, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे अवाहन करण्यात आले आहे.

मध्यम स्वरुपाचा पाऊस

रविवारी मुसळधार आणि सोमवारपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस हा कोकण विभागात पडले असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलैच्या 1 तारखेपासून सलग 18 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे जून महिना कोरडा गेला असतानाही आता सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा

२३ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

२४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव.


हेही वाचा – राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्याव-म्याव आवाज येतोय; नितेश राणेंचा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना टोला