Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र IMD : नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबादला वादळी पाऊस; हवामान खात्याचा इशारा

IMD : नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबादला वादळी पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Subscribe

 

मुंबईः नाशिक, जळगाव, अहमदनगर व औरंगाबादला पुढील ३ ते ४ तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने IMD दिला आहे. ३० ते ४० किमी प्रतितासाने वारे वाहतील. घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहनही IMD ने केले आहे.

- Advertisement -

तर मुंबईसह कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. खोल अरबी समुद्रात हे वादळ असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे हवामान खात्याने सांगितले आहे. या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास आहे. चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवदाळ पुढे सरकत असलं तरी हळूहळू त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

महाराष्ट्रात मान्सून पुढील आठवड्यात होणार दाखल

रवर्षी केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यंदा मात्र ४ किंवा ५ जूनला पोहचणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी 8 दिवस उशिराने मान्सूस येणार असल्यामुळे जूनच्या १४ ते १५ तारखेपर्यंत राज्यात दस्तक देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे जूनमधे सरासरीच्या २५ टक्के कमी पाऊस पडण्याची आहे. दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले होते.

मान्सूनच्या विलंबामुळे महाराष्ट्रात जूनमध्ये उष्णतेची लाट

- Advertisement -

केरळमध्ये मान्सूनची प्रगती कशी होते यावर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे जूनमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. वळवाचा पाऊस पडल्यानंतर वातावरणात थोडासा गारवा पसरतो. मात्र, मुंबईमध्ये अजूनही वळवाचा न पडल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे गेल्या महिन्यात 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. हे यंदाच्या मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते.

स्कायमेटने वर्तवला ९४ टक्के पावसाचा अंदाज

यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यांत सरासरीच्या केवळ ९४ टक्केच पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार अल-निनोच्या प्रभावामुळे देशात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांत पावसाची सरासरी ८५८.६ मिमी राहण्याची शक्यता आहे. गुजरातसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सूनच्या मुख्य महिन्यांत कमी पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांत हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -