Weather Update: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, IMDचा इशारा

rain update the possibility of torrential rains for the next five days in state imd

गुलाब चक्रीवादळानंतर आता शाहीन चक्रीवादळाचा असर आता अनेक राज्यांवर होत असल्याचे दिसत आहे. हवामान विभाग मान्सून परतण्याबाबत बोलत असतानाच काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात आला आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यावर दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीवर एक चक्रीय अभिसरण तयार झाले आहे. एका कमी दाबाच्या क्षेत्रापासून पूर्व झारखंडमधील उत्तर ओरिसापर्यंत कमी दाबाची रेषा पसरली आहे. यामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये ४ ते ६ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर गोवा, दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रामध्ये ४ ते ८ ऑक्टोबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. स्कायमेट वेदरनुसार ६ ऑक्टोबरपासून मान्सून परतण्यासाठी स्थिती अनुकूल होत आहे.

या राज्यांमध्ये पावसाचा सौम्य आणि मध्यम पाऊस

स्कायमेट वेदरनुसार, पुढील २४ तासांदरम्यान आसाम, मेघालय, नागालँड, तामिळनाडू, केरळ, अंदमान आणि निकोबार लक्षद्विपच्या काही भागांवर सौम्य आणि मध्यम पाऊस पडू शकतो.


हेही वाचा – दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक पश्चिम महाराष्ट्रासह कोकणच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी