घरताज्या घडामोडीIMD ALERT ! विकेंडला अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा ईशारा, कधी, कुठे, किती...

IMD ALERT ! विकेंडला अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा ईशारा, कधी, कुठे, किती पाऊस ?

Subscribe

राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसासाठीचा ईशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या विकेंडला वादळी वाऱ्यासह तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो. प्रादेशिक हवामान केंद्राने येत्या पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवणारी मार्गदर्शिका जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्याची शक्यताही प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने वर्तवली आहे. राज्यातील पुणे, नाशिक, अहमदनगर या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवली आहे. येत्या दोन दिवसांमध्येही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती हवामान विभागाने जाहीर करत त्याअनुषंगाने उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. येत्या विकेंडला काही भागात मात्र पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांसाठीचा ईशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. (IMD ALERT ! IMD monsoon thunderstorm alert for Maharashtra for next five days)

हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार राज्यातील अनेक भागात पावसाला याआधीच सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा परिसरात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावलेली आहे. तर राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळेच येत्या तीन दिवसांमध्ये कोणत्या भागात पावसाची हजेरी लागणार याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना तसेच राज्यातील नागरिकांसाठी पावसासाठी अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस ?

आज शुक्रवारी १९ मार्च रोजी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अमदनगर या जिल्ह्यात वर्तवण्यात आली आहे. ताशी ३० किमी ते ४० किमी या वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शनिवारी २० मार्च रोजी विजेच्या कडकडाटासह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर रविवार २१ मार्च रोजीही पावसाची चांगली हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी राज्यातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -