घरदेश-विदेशIMD म्हणते, मान्सूनला चार दिवस होणार उशीर; स्कायमेटच्या अंदाजानंतर वर्तवली शक्यता

IMD म्हणते, मान्सूनला चार दिवस होणार उशीर; स्कायमेटच्या अंदाजानंतर वर्तवली शक्यता

Subscribe

 

नवी दिल्लीः यंदा मान्सूनला उशीर होणार असल्याची शक्यता skymet ने वर्तवली आहे. skymet ने मान्सूनला किती उशीर होईल हे सांगितले नाही. पण भारतीय हवामानशास्त्र विभागाने IMD ने मान्सून ४ जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. सामान्यतः मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होतो.

- Advertisement -

या वर्षी केरळच्या दक्षिण-पश्चिममधून मान्सूनची सुरूवात उशीराने होणार आहे. त्यामुळे १ जून ऐवजी ४ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल. गेल्यावर्षी अंदाजित वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, अशी माहिती IMD ने दिली आहे. तर skymet नेदेखील मान्सून उशीराने केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यापर्यंत हवामान गरमच राहिल, असेही skymet ने सांगितले आहे.

यंदा पाऊस चांगला होणार आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD व स्कायमेटने याधीच वर्तवला आहे. पण मान्सून कधी दाखल होणार याचा अंदाज IMD ने वर्तवलेला नव्हता. मंगळवारी संध्याकाळी IMD हा अंदाज वर्तवला.  स्कायमेटनेही मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार केरळामध्ये यंदा मान्सून उशिराने दाखल होणार आहे. जूनपर्यंत गरम हवामान कायम राहणार आहे. उत्तर भारतात १८ मे नंतर गडगडाट व वादळ असेल. दरवर्षी १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा त्याला उशिर होणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

- Advertisement -

यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यांत सरासरीच्या केवळ ९४ टक्केच पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार अल-निनोच्या प्रभावामुळे देशात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांत पावसाची सरासरी ८५८.६ मिमी राहण्याची शक्यता आहे. गुजरातसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सूनच्या मुख्य महिन्यांत कमी पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांत हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -