घरमहाराष्ट्रकाळजी घ्या! पारा वाढणार...; राज्यातील 'या' जिल्ह्यांत उन्हाच्या झळा वाढणार

काळजी घ्या! पारा वाढणार…; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत उन्हाच्या झळा वाढणार

Subscribe

अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची झळ अद्याप भरून निघाली नाही तोवर आता आणखी चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे.

Maharashtra Weather Update : संपूर्ण मार्च महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं असून गेल्या काही दिवसांपासून अवकाळीने काहीशी विश्रांती घेतलीय. अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची झळ अद्याप भरून निघाली नाही तोवर आता आणखी चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे. मार्च अखेरीपर्यंत राज्याचा पारा आणखी वाढणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मार्च महिना संपत असताना राज्यातील तपमानात मोठे बदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ वगळता सर्व जिल्ह्यांच्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्दा कडाका वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पहायला मिळणार आहे. काही ठिकाणी रिमझीम पावसाच्या सरी देखील कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कोकण, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाट येण्याची भीती आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

एकंदरीत राज्याचं कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मार्च महिन्यातल्या अवकाळी पावसानंतर आता एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसंच जर घराबाहेर पडलात, तर सोबत पाण्याची बाटली ठेवण्यास विसरू नका, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्यात उष्णतेचा सर्वात जास्त धोका हा लहान मुलं आणि वृद्धांना असतो, त्यामुळं आता प्रखर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लहान मुलं आणि वृ्द्धांना घराबाहेर पडू देऊ नका, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -