घरताज्या घडामोडीराज्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट जारी

राज्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट जारी

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यभरात पावसाने धुमशान घातल्यानंतर राज्यभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसांडून वाहत आहेत. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागर भागात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत तीव्र होत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे. विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

- Advertisement -

कोकणात पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुबारमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यासह मुंबईलाही 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासांत अधिक तीव्र होणार असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दीड आणा नाके, जुना पुणे रोड “सारडा सर्कल”


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -