राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईसह (Mumbai) राज्यभरात पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) अनेक सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीला (Road Transport) ब्रेक लागला असून, नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले.

unseasonal heavy rains with strong winds in Sangameshwar Damage to fruit crops including mango and cashew
संगमेश्वर तालुक्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस, आंबा, काजूसह फळ पिकांचे नुकसान

आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईसह (Mumbai) राज्यभरात पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) अनेक सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीला (Road Transport) ब्रेक लागला असून, नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. मुंबईत मागील तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार अजून कायम आहे. तसेच, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, राज्यातील ६ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. (IMD Warning of heavy rain to 6 distric of maharashtra)

हवामान विभागाने ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला असून, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईसह राज्यभरात सध्या मान्सून व्यापला आहे. मागील काही दिवसांपासून सतत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. शिवाय, पावसाचा जोर वाढल्यावर हवामान विभागाकडूनही सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. त्यानुसार, आताही हवामान विभागाकडून शुक्रवार ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मागील तीन दिवसांपासून कोकण, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे.

मुसळधार पावसामुळे नदी व नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरत असून, मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, घाटमाथ्यावरील परिसरात दरड ही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.


हेही वाचा – डोक्यावर लाकडाची मोळी घेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे गॅस दरवाढी विरोधात आंदोलन