Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Weather update: राज्यावर अवकाळी पावसाचे ढग, येत्या ५ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

Weather update: राज्यावर अवकाळी पावसाचे ढग, येत्या ५ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह कोकण गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता

Related Story

- Advertisement -

राज्यात एकीकडे कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून राज्यात दुसरीकडे अवकाळी पावसाने पुन्हा डोके वर काढले आहे. या बदलत्या वातावरणामुळे अनेक राज्यात तीव्र उन्हाळा जाणवतोय तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ऋतु बदलाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे. चंद्रपूरात शुक्रवारी भर दुपारी कडक्याच्या उन्हात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. चंद्रपूर जिल्हात नागरिक तीव्र उन्हाची झळ सोसत असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील काहीसा गारवा चंद्रपूरकरांना अनुभवता आला. मात्र ऐन उन्हाळ्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम रात्रीच्या वेळेस जावू लागला. राज्यात रात्रीच्या वेळी उकाड्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मागील काही आठवड्यात राज्य़ातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्य़ानंतर हळूहळू तापमानाचा पार वाढत होता. मात्र तेवढ्यात वातावरणात पुन्हा बदल होत येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटासह मुसळदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात उद्यापासून हवामान मध्य स्वरुपाचे राहणार असून विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे.

- Advertisement -

राज्यात येत्या ४ ते ५ दिवसात काही भागांमध्ये विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता असून २५ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर २७ ते २८ एप्रिलदरम्यान कोकणासह गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकडील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची (Non seasonal Rain) स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातही पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -