Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर अपघातांची तीव्रता रोखणार ‘इम्पॅक्ट एटेन्युएटर’ तंत्रज्ञान; काय आहे ही सिस्टीम?

समृध्दी महामार्गावर अपघातांची तीव्रता रोखणार ‘इम्पॅक्ट एटेन्युएटर’ तंत्रज्ञान; काय आहे ही सिस्टीम?

Subscribe

नाशिक : राज्याच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या नागपूर मुंबई समृध्दी महामार्गावर वाढत्या अपघाताच्या घटना पाहता आता या अपघातांची तीव्रता रोखण्यासाठी ‘समृद्धी’वर आता ‘इम्पॅक्ट एटेन्युएटर’ चा वापर करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नाशिक या नव्याने सुरू होत असलेल्या मार्गावर या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून खुला करण्यात आला. शिर्डी ते भरवीर ८० किलोमीटरचा हा टप्पा 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र दुसरीकडे जेव्हापासून पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु झाली. मात्र दुसरीकडे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे समृद्धी महामार्ग आणखी चर्चेत आला. आता याच अपघातांची तीव्रता कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गावर ‘इम्पॅक्ट एटेन्युएटर’ या अंधानुक तंत्राचा वापर करण्यात आला आहे. नाशिक ते शिर्डी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील 122 स्ट्रक्चरवर असे एकूण 244 इम्पॅक्ट एटेन्युएटर्स बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये पुलांचे कठडे वा ज्या ज्या ठिकाणी आर.सी.सी.चे बांधकाम असेल तेथे हे इम्पॅक्ट एटेन्युएटर्स बसविण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावरून अतिवेगाने जाणारी वाहने अशा कठोर बांधकामांवर आदळून होणार्‍या अपघातांप्रसंगी या तंत्राचा उपयोग होणार आहे.

अशी आहे ‘इम्पॅक्ट एटेन्युएटर’ यंत्रणा

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर अतिवेगाने वाहन धावत असतात. अशावेळी टायर फुटून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहे. अशावेळी आदळणार्‍या वाहनांची गतिज ऊर्जा शोषून घेण्याची ताकद इम्पॅक्ट एटेन्युएटर मध्ये असेल. महार्गावरील कठडे वा अन्य कठीण बांधकामांच्या प्रारंभी व शेवटाला हे एटेन्युएटर्स बसविण्यात येतात. त्यामुळे वेगातील वाहन थेट या कठीण बांधकामांना धडकण्याऐवजी अगोदर इम्पॅक्ट एटेन्युएटरला धडकते. या प्रक्रियेत त्यातील गतिज ऊर्जा शोषली जात असल्याने आतील व्यक्ती एकदम फेकली जाण्याची अथवा वाहनाच्या आतील भागावर आदळण्याच्या प्रक्रियेतील तीव्रता कमी होते. परिणामी, वाहनातील व्यक्तींना कमी प्रमाणात शारीरिक इजा होते. अनेकदा संभाव्य मृत्यूपासून देखील बचाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे संबंधित वाहनाचे होणारे नुकसानही तुलनेने कमी होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -