घरमहाराष्ट्र'कायर'चा कोकणाला धोका; भारतात २४ तासांत सक्रिय

‘कायर’चा कोकणाला धोका; भारतात २४ तासांत सक्रिय

Subscribe

चक्रीवादळाची निर्मिती कधी होईल याबद्दल प्रारूपांमध्ये एकमत झाले नसून सध्या ही प्रणाली मुंबईच्या नैऋत्य दिशेला ४५० किमी अंतरावर आहे. पुढच्या २४ तासात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता

येत्या दोन दिवसात हे वादळ कोकण आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘कायर’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आगामी दोन दिवस सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसणार असल्याने या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कायर वादळाचा सिंधुदुर्गातील देवगड, मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे.

देवगड, मालवण, वेंगुर्ल्याला 'कायर'चा तडाखा

देवगड, मालवण, वेंगुर्ल्याला 'कायर'चा तडाखा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 25, 2019

- Advertisement -

या चक्रीवादळामुळे आणि सिंधुदुर्ग भागात मुसळधार पाऊस पडल्याने समुद्र किनाऱ्यावर मोठाल्या लाटा आदळत असल्याने शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या असून देवगड तालुक्यातील अनेक गावं आज पाण्याखाली आहेत. मुणगे, मोर्वे, तांबळडेग, मिठबांव,कातवण, कुणकेश्वर, विजयदुर्ग या गावांना वादळाचा मोठा फटका बसला आहे.

भारतात २४ तासांत ‘कायर’ होणार सक्रिय

हवामान प्रारूपांच्या अनुसार, सध्या ही प्रणाली व्यापक आहे, जी लवकरच ‘चक्रीवादळा’ मध्ये रूपांतरित होवू शकते. आत्तापर्यंत, चक्रीवादळाची निर्मिती कधी होईल याबद्दल प्रारूपांमध्ये एकमत झाले नसून सध्या ही प्रणाली मुंबईच्या नैऋत्य दिशेला ४५० किमी अंतरावर आहे. पुढच्या २४ तासात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून आसपास चा प्रदेश प्रभावित होण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

दाट ढग, पाऊस, गडगडाटी वादळे आणि जोरदार वारा यांचा पुढील ४८ तास भूभागावर परिणाम जाणवेल, त्यानंतर धोका कमी होण्यास सुरूवात होईल. बहुतेक हवामान प्रारूपांच्या संकेतानुसार हे चक्रीवादळ ओमानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. तथापि, चक्रीवादळ कराचीच्या किनाऱ्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -