घरमहाराष्ट्रनाशिकदेवळाली कॅम्पच्या लष्करी भागात प्रवेश करणाऱ्या तोतयाला अटक

देवळाली कॅम्पच्या लष्करी भागात प्रवेश करणाऱ्या तोतयाला अटक

Subscribe

लष्करी गणवेश परिधान करत बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरीचे अमिष देण्याचा संशय

नाशिकरोड :  अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी हद्दीत लष्करी गणवेश परिधान करुन प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला लष्करी जवानांनी ताब्यात घेतल्याची घटना पुढे आली आहे.

जवानांनी त्याच्याकडून बनावट कागदपत्र जप्त केली असून, त्याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लष्करात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करण्याचा त्या तोतया अधिकाऱ्याचा प्रयत्न असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२८) दुपारी लष्करी भागात संशयित गणेश वाळू पवार (रा. हरसूल, ता. चांदवड) हा फिरताना आढळला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरुन एम.एच गेट, आर्मी स्टेशन येथे तैनात जवानांनी गणेशला हटकलं. लष्करी गणवेश घातलेल्या गणेशने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर जवानांनी त्याला ताब्यात घेतलं. कसून चौकशीत गणेशने तोतयागिरीबाबत कबुली दिली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -