राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणा यांची मागणी

Navneet rana
नवनीतकौर राणा

सध्या राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी खासदार नवनीतकौर राणा यांनी केली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात ही परिस्थिती असतानाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मातोश्रीवर बसून आहेत अशी टीका नवनीतकौर राणा यांनी केली आहे.

महाराष्ट्र आर्थिकस्थितीत देशात अव्वल आहेच पण आता दुर्देवाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या स्थितीतही महाराष्ट्र अव्वल स्थानावर आङे. दिवसेंदिवस राज्यात मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशातील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. तर सर्वाधिक रूग्ण संख्याही महाराष्ट्रात आहे. याचाच अर्थ सरकार कुठे तरी कमी पडत आहे. असा आरोप नवनीतकौर राणा यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोरोना काळात मातोश्री बाहेर पडायलाच तयार नाहीत. ना आजपर्यंत ते कोणत्या जिल्ह्यात गेलेत ना कधी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली आहे. ना कधी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी केली. आमरावती जिल्ह्यात दोन दिवस ऑक्सिजन पुरवठा बंद आहे. नागपुरवरून ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. पण मुख्यमंत्री काही घराबाहेर पडायला तयार नाहीयेत.


हे ही वाचा – Photo: छत्रपती शिवाजी पार्कवर कलाकारांचा एल्गार, काम सुरू करू देण्याची सरकारकडे मागणी!