घरमहाराष्ट्रलोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने शिंदे गटातील समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकालानंतर त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आज बहुमत आमच्याकडे आहे. देशात जे निर्णय होतात ते नियम, कायदे यांच्या आधारावर होतात. शेवटी निवडणूक विभाग हा स्वतंत्र विभाग आहे. जो काही निर्णय असतो तो कोर्टात होतो. लोकशाहीत हे अपेक्षित होतं, आम्ही घेतलेला निर्णय हा कायद्याच्या विरोधात जाऊन घेतलेला नाही. घटनातज्ज्ञांनाही हेच वाटत होतं”.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालायने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली आहे. निवडणूक आयोगदेखील याबाबतीत सुनावणी घेऊन निकाल देऊ शकतो, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. संविधान आहे, कायदा आहे, यावर निर्णय होत असतात. आम्ही कोणतेही कृत्य कायद्याबाहेर जाऊन केलेलं नाही. हे सरकार शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे. घटनेच्या, कायद्याच्या आधारावर सरकार स्थापन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करतो. न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. लोकशाहीमध्ये हा निर्णय सगळ्यांनाच अपेक्षित होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालाने दिला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -