Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : पुण्यात भारत-इंग्लंड सामना, GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Devendra Fadnavis : पुण्यात भारत-इंग्लंड सामना, GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Subscribe

पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी पुण्यात 31 मार्च रोजी भारत-इंग्लंड सामना होणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

पुणे : सध्या पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात GBS या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर पोहचली आहे. एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. यातील 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात रविवारी एकाच दिवसांत 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसात पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी-20 सामना खेळला जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Important instructions from Devendra Fadnavis in the wake of the Gullen Barri Syndrome disease in Pune)

पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, दुर्मिळ रोग असल्यावरही बहुतेक रुग्ण बरे होतात. त्यामुळे गुलेन बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य रोग नसल्याने घाबरण्याची काहीच गरज नाही. पुण्यात या आजाराचे आतापर्यंत 111 रुग्ण सापडले असून 80 रुग्ण हे 5 किलोमीटरच्या परीसरात आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून 35,000 घरे आणि 94,000 नागरिकांच्या चाचण्या होणार आहेत. यासाठी एनआयव्हीची (NIV) मदत घेतली जात आहे. पुण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण त्या व्यक्तीचा मृत्यू गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे झाला आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही, तरीही खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा – GBS : पुण्यानंतर कोल्हापुरात GBSचा धोका वाढला; दोन जण पॉझिटिव्ह

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात 31 मार्च रोजी भारत-इंग्लंड सामना होणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्यावे. कारण हा विकार पिण्याचे पाणी दूषित किंवा न शिजवलेले अन्न व मांस खाल्ल्याने होत आहे. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळा, पाणी उकळून प्या. तसेच या आजारासंबंधी जे उपचार आहेत, ते महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. याशिवाय शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या उपचाराची विशेष व्यवस्था निर्माण करा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.

गुलियन बॅरी सिंड्रोमची लक्षणं काय?

दरम्यान, पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ असल्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या आजाराची लक्षणे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दल एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात संपूर्ण आजाराबद्दलची नोंद करण्यात आली आहे. जसे की, थकवा किंवा हातापायाला मुंग्या येणं, झिणझिण्या येणं ही या आजाराची प्राथमिक लक्षण आहेत. आजार झाल्यास सुरुवातीला पायाला त्रास व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर या आजाराची लक्षणे हातापासून चेहऱ्यावर पसरतात. या काळात काहींना पाठदुखी होते, तर काहींना श्वास घ्यायला आणि अन्न गिळायला त्रास होतो.  अचानक पाय किंवा हाताला कमजोरी येणे, लकवा मारणे, अचानकपणे चालताना त्रास होणे किंवा खूप दिवस डायरियाचा त्रास होतो.

हेही वाचा – Ajit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; अजित पवार, पंकजा मुंडे गुरुवारी बीड दौऱ्यावर