मातोश्री’वर सिनेट सदस्य वाढविण्यासाठी माजी नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक

mumbai university

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यत्वासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी शुक्रवारी ‘मातोश्री’वर मुंबईतील माजी नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

शिवसेनेचे नेते, माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली. आता मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे दहा सदस्य निवडून आले होते. मात्र वेळी जास्तीत जास्त सिनेट सदस्य निवडून आणा. त्यासाठी अधिक मेहनत घ्या. सर्वांनी जास्तीत जास्त फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहन माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित माजी नगरसेवकांना केले, अशी माहिती माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी दिली.

अमेय घोले गैरहजर

या बैठकीला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जवळजवळ सर्वच माजी नगरसेवक उपस्थित होते. मात्र माजी नगरसेवक अमेय घोले हे गैरहजर होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.


हेही वाचा : मुंबईत कलम 144 लागू, कोणत्या गोष्टी सुरू आणि बंद राहणार?