घरमहाराष्ट्रवाचा... दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

वाचा… दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Subscribe

अवघा एक महिना शिल्लक असलेल्या दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून जरी हॉल तिकीट मिळणार असले तरी, त्याआधीच विद्यार्थी आपले हॉल तिकीट हे ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

अवघा एक महिना शिल्लक असलेल्या दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून जरी हॉल तिकीट मिळणार असले तरी, त्याआधीच विद्यार्थी आपले हॉल तिकीट हे ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा येत्या 2 मार्चपासून सुरु होणार आहेत. यासाठी लागणारे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट आता डाऊनलोड देखील करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्चपासून सुरु होणाऱ्या दहावीच्या बोर्डाचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना आज (ता. 6 फेब्रुवारी) तीन वाजल्यापासून डाऊनलोड करता येणार आहे. हे हॉल तिकीट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://www.mahahsscboard.in अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमधून हाॅल तिकिट उपलब्ध करून देण्यात येईलच. पण त्याआधीच विद्यार्थी आपले हाॅल तिकिट मिळवू शकतात. दरम्यान, विद्यार्थ्यांना आपपल्या शाळेतून हॉल तिकीट मिळेल. सदर शाळांनी हॉल तिकीट ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करून विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेता मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असे आदेश बोर्डाकडून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे SSC Exam Timetable या लिंकवरून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक देखील मिळवू शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – “लढायची ताकद नाहीये…” आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

दरम्यान, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांना एक महिन्यापेक्षा देखील कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत बोर्डाच्या परीक्षा पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आणि शाळांकडून परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. कोरोना कालावधीनंतर पहिल्यांदाच कोणत्याही कोरोना नियमांशिवाय या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -