Imtiaz Jalil : पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिला तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, इम्तियाज जलील यांचा इशारा

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ५० हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येऊ, असा विश्वास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी व्यक्त केला आहे. जालना येथील ईद मिलन कार्यक्रमात बोलतांना त्यांनी जालन्यातून (Jalna) लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिला तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, इशारा इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

…तर जालन्यातूनच निवडणूक लढवू

औरंगाबादेतील लोकसभा निवडणुकीत जेव्हा मी पाच हजार मतांनी विजयी झालो, तेव्हा विरोधकांनी एक भितीचं वातावरण लोकांच्या मनामध्ये तयार केले होते. एमआयएमचा खासदार आला, आता शहराचे काही खरे नाही, असे चुकीचे चित्र निर्माण केले गेले, असं इम्तियाज जलील म्हणाले. जालन्यातील सत्कार आणि एमआयएमला मिळत असलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलो असून पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिला तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, अशी इच्छा जलील यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या अडीच-तीन वर्षांच्या काळात मी आणि माझ्या पक्ष्याने जी काम शहरांत आणि जिल्ह्यात केली आहे. त्यामाध्यमातून आम्ही सर्व जाती-धर्मांच्या लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की, २०२४ मध्ये पाच नाहीतर तब्बल पन्नास हजार मतांनी आघाडी घेऊन निवडून येईल, असं जलील म्हणाले.

आमच्या भागातल्या नेत्यांबाबत तुम्हाला काय कळते?

आमच्या भागातल्या नेत्यांबाबत तुम्हाला काय कळते?, असं खैरे मला म्हणतात. तेव्हा मला त्यांना आठवण करून द्यावी लागते की मी जिल्ह्याचा खासदार आहे. बरं ही स्मारकं, पुतळे सरकारी पैशातून बांधली जातात. कुठलाच नेता आपल्या खिशातून एक दमडीही देत नाही, असं म्हणत जलिलांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे.


हेही वाचा : Sanjay Raut : भोंगे लावून केलेली कामं सांगणार, राज ठाकरे आणि भाजपला राऊतांचा टोला