घरताज्या घडामोडीइम्तियाज जलील याचं आजचं आंदोलन स्थगित; २ दिवसांनी पुन्हा आंदोलन करणार!

इम्तियाज जलील याचं आजचं आंदोलन स्थगित; २ दिवसांनी पुन्हा आंदोलन करणार!

Subscribe

उद्या मशिदी उघडण्यासाठी तर दोन दिवसांनी पुन्हा मंदिरासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

‘राज्य सरकारने १ सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू’, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला दिले होते. त्यावरुन आज औरंगाबादच्या प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरासमोर शिवसेना-एमआयएम आमने सामने आल्याचे दिसून आहे. मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतर आजचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. पण, आजचे आंदोलन स्थगित केले असले तरी देखील उद्या मशिदी उघडण्यासाठी तर दोन दिवसांनी पुन्हा मंदिरासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

शिवसेना-एमआयएम आमने सामने

‘औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील राजकारण करत आहेत. त्यांनी तसे करु नये, मंदिरे उघडण्याचे आम्ही समर्थन करत आहोत. पण, जोपर्यंत मुख्यमंत्री सांगत नाही तोपर्यंत मंदिरे उघडली जाऊ नये. जरी त्यांनी सांगितले असेल की, मी दोन दिवसांनी पुन्हा याठिकाणी येणार आहे. तर येऊ दे. आम्ही घाबरत नाही. आम्ही शिवसेनेची माणस आहोत. तसेच कोरोना महामारी फार गंभीर असून त्याच्याशी सामना करयाचा आहे. मंदिरे उघडण्याचा निर्णय जलील यांनी घेऊ नये, जलील यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न देखील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘आमची मंदीर उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तसेच येत्या ४ ते ५ दिवसात मुख्यमंत्री मंदिराबाबत योग्य तो निर्णय घेणारच आहेत. त्यामुळे कोणीही राजकारण करु नये. तसेच तुम्ही मंदीराला हात लावून दाखवा, मग आम्ही देखील उत्तर देऊ’, असा इशारा देखील खैरे यांनी दिला आहे.


हेही वाचा – मंदिरे उघडण्यासाठी MIM आक्रमक; औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -