भाजपचे २ मंत्री उद्घाटनासाठी खिशात कात्री घेऊन फिरतात, जलील यांची खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या अल्पसंख्यांकासाठी योजना जाहीर केल्या आहेत. त्याबाबत आढावा घेतला जाणे फार महत्त्वाचे आहे. या योजनांची केवळ मोठ्या प्रमाणात जाहीरात करण्यात येते. जाहिराती होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही

imtiaz Jaleel's criticism over bjp 2 BJP Ministers work for inauguration
भाजपचे २ मंत्री उद्घाटनासाठी खिशात कात्री घेऊन फिरतात, जलील यांची खोचक टीका

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. भाजपचे दोन मंत्री खिशात कात्री घेऊन फिरतात. उद्घाटन दिसलं की रिबिन कापतत अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकांसाठी घोषित केलेल्या योजनांवरुनसुद्धा भाजपवर जलील यांनी निशाणा साधला आहे.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत संवाद साधताना जलील यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. भाजपचे दोन मंत्री खिशात कात्री घेऊन फिरतात, उद्घाटन कार्यक्रम दिसला की रिबिन कापतात आणि भाषण करतात. त्यांच्याकडे चांगली काम करण्यासाठी तासभर वेळ नाही असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधत पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकांसाठी योजना घोषित केल्या आहेत परंतु त्या कागदावरच आहेत. त्याचा लाभ औरंगाबाद जिल्ह्यात नेमका कोणाला मिळाला याबाबत माहिती नाही. या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे का? याबाबत कोणाला काहीच माहिती नाही. यावरुन केंद्रीय मंत्री नक्की काय करतात असा सवाल इम्तियाज जलील यांनी भाजपला केला आहे.

योजनांची केवळ मोठ्या प्रमाणात जाहीरात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या अल्पसंख्यांकासाठी योजना जाहीर केल्या आहेत. त्याबाबत आढावा घेतला जाणे फार महत्त्वाचे आहे. या योजनांची केवळ मोठ्या प्रमाणात जाहीरात करण्यात येते. जाहिराती होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही असेही जलील यांनी म्हटलं आहे. ज्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी होते का? याबाबतचा आढावा तीन महिन्यांतून घेतला पाहिजे असे असे मत जलील यांनी व्यक्त केलं आहे.


हेही वाचा : विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे