काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं, इम्तियाज जलील यांचा इशारा

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं असून सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. मात्र महाविकास आघाडी सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळेस औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा निर्णय आज ठाकरे सरकारने घेतलाय, या निर्णयावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे कुणीही लोक दिसले तर त्यांच्या फोटोंवर जोड्यांची माळ घाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं, पाहा आम्ही तुमचं कसं स्वागत करतो, असा इशाराच जलील यांनी दिला आहे.

आज आमची संपूर्ण नाराजी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे. यांनी आतापर्यंत आपली सत्ता वाचवण्यासाठी कोणासोबतही गेले. कॅबिनेट मीटिंगमधून दोन काँग्रेसचे मंत्री बाहेर आले होते, त्यांना थोडीही लाज असेल तर आजच राजीनामा द्यावा. अशाप्रकारचे नाटक करुन लोकांना मूर्ख बनवू नका, असं जलील म्हणाले.


हेही वाचा : विवेक फणसळकर मुंबईचे पोलीस आयुक्त