घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या नकारानंतरही भेटण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार - इम्तियाज जलील

मुख्यमंत्र्यांच्या नकारानंतरही भेटण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार – इम्तियाज जलील

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. पक्षासोबत झालेल्या बैठकीनंतर एमआयएमसोबत युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. परंतु मुख्यमंत्री हे त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री नसून ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मला आदर आहे. त्यामुळे मी त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नकारानंतरही भेटण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचं खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या नकारानंतरही भेटण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार 

इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री हे पक्षाचे मुख्यमंत्री नसून ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मला आदर आहे. त्यामुळे मी त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता जर हिंदुत्ववादीचा गाजावाजा करत राहीले. तर हे कधीपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या लढाईमुळे देश कुठे चाललेला आहे. आपल्याला देशाची आणि राज्याची चिंता आहे की फक्त हिंदुत्वाची?, असा सवाल जलीलांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे आम्हाला करावं लागेल. ते करण्यासाठी आम्ही तयार होतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आम्ही हे कोणाच्याही बोलवण्यावरून करत नाही आहोत. या देशाला आणि राज्याला वाचवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.

कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही?

औरंगजेबच्या कबरीसमोर जाऊन आम्ही नतमस्तक होतो, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आहे. औरंगजेब हा एक इतिहासाचा मुद्दा आहे. त्यामुळे ते तुम्हाला वाईट किंवा चांगलं वाटणं हे एक वेगळी गोष्ट आहे. हे धार्मिक आणि राजकीय मुद्दे हा पक्षांचा धंदा झालाय, असं इम्तियाज जलिल म्हणाले.

- Advertisement -

भाजप हा देशासाठी सर्वात मोठा घातक असा राजकीय पक्ष आहे. राजकीय स्वार्थासाठी भाजपाने जे काही मागील ७० ते ७५ वर्षांत काही केलेलं नाही. ते आता समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं जलील म्हणाले.


हेही वाचा : महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजपला घेरलं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -