राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने सौम्य कलमे, पुढील काळात गरज पडण्याची शक्यता, जलील यांचा आरोप

imtiyaz Jalil alleges cm uddhav thackeray file mild clauses against Raj Thackeray
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने सौम्य कलमे, पुढील काळात गरज पडण्याची शक्यता, जलील यांचा आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक वक्तव्य आणि चिथावणीखोर भाषण केल्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्यामुळे राज ठाकरेंवर सौम्य कलमे लावण्यात आले आहेत. राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु राज ठाकरेंना जामीन मिळेल अशी सौम्य कलमे लावण्यात आली आहेत. असे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

खासदार इम्तयाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधा दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जलील म्हणाले की, राणा दाम्पत्यावर केवळ हनुमान चालीसा पठण करण्याच्या इशाऱ्यावरुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग राज ठाकरेंवर का करण्यात आला नाही. राज ठाकरेंनी चिथावणी देणारे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्यामुळे गृहविभागाच्या आदेशानेच राज ठाकरेंवर सहज जामीन मिळेल अशी कलमे लावण्यात आली आहेत.

राज ठाकरेंवर औरंगाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. कलम 116,117,153 ए,135 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलिसांनी सर्व डेटा गोळा केला. सभेच्या ठिकाणी पोलिसांकडूनही सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त आज राज ठाकरेंवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. राज ठाकरे यांच्यावर सौम्य कलम लावण्यात आले आहे. राणा दाम्पत्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांना असं वाटत आहे की, माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करु? राष्ट्रवादीला वाटत आहे की, राज ठाकरेंसोबत भविष्यात जावं लागलं, तर त्यासाठी आत्ता त्यांच्यावर गंभीर कलमं लावली जाऊ नयेत? फक्त दाखवण्यासाठी काही सौम्य कलमं लावण्यात आली आहेत असं आता जनतेला वाटू लागलं आहे, असे जलील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंवर अखेर गुन्हा दाखल, औरंगाबाद सभेवरुन पोलिसांची मोठी कारवाई