घरCORONA UPDATEराज्यात 24 तासांत 881 कोरोना बाधितांची नोंद, तर 5 रुग्णांचा मृत्यू

राज्यात 24 तासांत 881 कोरोना बाधितांची नोंद, तर 5 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासांत 881 इतक्या नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 426 इतकी आहे.

राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्क्यांवर आले आहे. राज्यात 881 इतक्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 963 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 79,59,133 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

देशात 5 हजार 108 कोरोना रुग्णांची नोंद

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 215 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. देशातील रिकव्हरी रेट 98.71 टक्के आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची छापेमारी, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -