धक्कादायक! पाच दिवसांत पुण्यातील नदीपात्रात आढळले दोन महिलांसह ४ मृतदेह

पुण्यातील नदीपात्रात मागील पाच दिवसांत चार मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रात पाच दिवसांत चार मृतदेह सापडले आहे. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे.

पुण्यातील नदीपात्रात मागील पाच दिवसांत चार मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रात पाच दिवसांत चार मृतदेह सापडले आहे. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, मृत व्यक्तींच्या मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. (In 5 Days 4 Dead Bodies Found In Bhima River In Pune District 2 Male And 2 Female)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भिमा नदीपात्रात 18 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह 38 ते 45 या वयोगटातील आहेत. या प्रकरणी सध्या पोलिसांना तपासाला सुरूवात केली आहे. पोलीस तपासात मृत व्यक्तींसोबत त्यांची मुले असण्याचीही शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, यातील एका मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी “दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात बुधवार (18 जानेवारी 2023) रोजी स्थानिक मच्छीमार मासेमारी करत होते. त्यावेळी त्यांना एका स्त्रीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर, शुक्रवारी पुरुषाचा मृतदेह आढळला. 21 तारखेला पुन्हा एका स्त्रीचा मृतदेह आढळला असून, 22 तारखेला पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळला. असे एकूण 5 दिवसात 4 मृतदेह आढळले”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहांमध्ये पती-पत्नी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी यानंतर भीमा नदी पात्रात कसून शोधकार्य सुरू केले आहे. तसेच परिसरात देखील या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल येण प्रतिक्षेत आहे.

परिणामी शवविच्छेदन अहवाल मिळाल्यास पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.


हेही वाचा – भ्रष्टाचारविरोधी लढा : मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या रडारवर