घरमहाराष्ट्र'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार, पण...'; अजित पवारांनी 'या' नेत्यावर साधला निशाणा

‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार, पण…’; अजित पवारांनी ‘या’ नेत्यावर साधला निशाणा

Subscribe

बारामती : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख लांडगा असा केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर चौफेर सडकून टीका करण्यात येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पडळकरांविरोधात अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आंदोलनही केली आहेत. दरम्यान, बारामती सहकारी बँकेच्या बैठकीत कार्यकर्त्यांने गोपीचंद पडळकर यांना काळं फासण्याचा इशारा दिला. यावेळी अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. (In a democracy everyone has the right to express their opinion Ajit Pawar targeted Gopichand padalkar)

बारामती सहकारी बँकेच्या बैठकीत एका कार्यकर्त्यांने गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल काढलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्याचे बोलणे ऐकून घेतल्यावर स्वत: माईक हातात घेत आपली भूमिका मांडली.

- Advertisement -

हेही वाचा – आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू असलेल्या गदारोळात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुंबई दौरा; घेतले लालाबाच्या राजाचे दर्शन

अजित पवार म्हणाले की, तुम्ही मांडलेल्या भावना समजल्या, मात्र लोकशाहीत प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे, कोणी काय मत व्यक्त करावे हा संबंधिताचा प्रश्न असतो. त्यामुळे सहकारी बँकेच्या सभेत राजकीय मते मांडू नका. कारण इथे सर्वच राजकीय पक्षांना मानणारे सभासद आहेत. मात्र हे राजकीय व्यासपीठ नाही असे सांगत अजित पवार यांनी संबंधित कार्यकर्त्याला सल्ला दिला.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने बोलताना भान ठेवूनच बोलले पाहिजे या बद्दल दुमत नाही, सध्या वाचाळवीरांची संख्या कमालीची वाढत आहे, असा टोला त्यांनी गोपीचंद पडळकर यांनी न विसरता लगावला. लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, त्यामुळे राजकीय मते सहकारी बँकेच्या सभेत मांडू नका, अशा शब्दात अजित पवार यांनी  एका कार्यकर्त्याला सल्ला दिला. अजित पवार यांनी आपले राजकीय भान किती परिपक्व आहे याचाच प्रत्यय प्रसंगातून दाखवून दिल्याची नंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होताना दिसली.

हेही वाचा – Explainer : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्रतेवर सोमवारी सुनावणी; शिंदेंनंतर भाजपसमोर पर्याय काय?

काय म्हणाले होते पडळकर?

धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -