घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील महसूल विभागाचा असाही विक्रम; 'या'मध्ये मिळवला पहिला क्रमांक

महाराष्ट्रातील महसूल विभागाचा असाही विक्रम; ‘या’मध्ये मिळवला पहिला क्रमांक

Subscribe

कायद्यानुसार लाच मागणे, घेणे आणि देणे गुन्हा आहे. अशाप्रकरे लाचखोरीचे गुन्हे आढळल्यास संबंधीतांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कडक कारवाई केली जाते. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे राज्याच्या महसूल विभागात लाचखोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समजते.

कायद्यानुसार लाच मागणे, घेणे आणि देणे गुन्हा आहे. अशाप्रकरे लाचखोरीचे गुन्हे आढळल्यास संबंधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कडक कारवाई केली जाते. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे राज्याच्या महसूल विभागात लाचखोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समजते. कारण लाचखोरीत महाराष्ट्रातील महसूल विभाग पहिल्या स्थानावर असल्याची माहिती समोर येत आहे. (In Accepting Bribe Maharashtra Revenue Department Top )

मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात १७० प्रकरणांमध्ये २३६ महसूल कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. राज्यात आतापर्यंत ७४० लाच प्रकरणांची नोंद झाली असून सुमारे ३ कोटी २२ लाख रुपयांची लाच मागण्यात आली आहे.

- Advertisement -

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताज्या अहवालानुसार, १ जानेवारीपासून २८ डिसेंबपर्यंत लाचप्रकरणी ७१९ सापळे लावले होते. त्यात १०१६ अधिकारी, कर्मचारी अडकले. मागील वर्षभरात महसूल कर्मचाऱ्यांनी ३९ लाख ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणेचा क्रमांक लागतो. पोलीस विभागातील २२४ जण ‘एसीबी’च्या सापळ्यात सापडले आहेत. एकूण १६० प्रकरणांमध्ये लाचेची रक्कम ४२ लाख ४१ हजार होती.

महापालिका आणि जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील लाचखोरी वाढत असल्याचे समजते.
लाचेची रक्कम तुलनेने कमी असली, तरी लोक या व्यवस्थेत भरडले जातात. आता या कर्मचाऱ्यांच्या विरोधात देखील ‘एसीबी’कडे तक्रार करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गेल्या वर्षभरात विविध महापालिकांमध्ये लाचेची ४६ प्रकरणे निदर्शनास आली. यात ७१ जणांनी ६३ लाख ४ हजार रुपयांची लाच मागितली होती.

- Advertisement -

महावितरणचे ६६ भ्रष्ट कर्मचारी ५० प्रकरणांमध्ये ‘एसीबी’च्या हाती लागले आहेत. यात ६६ कर्मचाऱ्यांनी १० लाख ३७ हजार रुपयांची लाच मागितली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातील केवळ चार कर्मचाऱ्यांना ‘एसीबी’ने पकडले, त्यांची लाच ४६ हजार रुपयांची होती. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी लाच प्रकरणांची संख्या थोडी कमी झाली असली, तरी लाचेची रक्कम कमी झालेली नाही. गेल्या वर्षांत भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी ३ कोटी १० लाख रुपयांची लाच मागितली होती.

दरम्यान, राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे (एसीबी) मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे आठ विभाग आहेत. सरकारी कर्मचारी लाच घेत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘एसीबी’ शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करते.


हेही वाचा – टाटा सन्सचे माजी संचालक आरके कृष्णकुमार यांचे निधन, मित्र गमावल्याची रतन टाटांची भावना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -